जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२१ । वरणगाव बस स्थानक चौकापासून ते रेल्वे स्टेशनच्या रस्ता खडी करण होऊन दिड वर्षानंतर त्या रस्त्यावर खड्डे पडल्यावरही रस्त्याचे काम होत नसल्याने शहर भाजपाच्या वतीने खड्डे पुजन आंदोलन केल्यानंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचा मुहर्त मिळाला आहे. रस्ता रुंदी करणासाठी आ.सावकारे यांच्या उपस्थितीत सा.बा. अधिकारी व नागरिका मधील चर्चेने मार्ग मोकळा झाल्याने दोन दिवसात कामाल सुरुवात आहे.
वरणगाव शहरातील बस स्थानक चौका पासुन ते रेल्वे स्टेशनचा रस्ता चोवीस मिटरचा रस्ता नव्याने तयार करूण त्या मधोमध दुभाजक टाकुन त्यात पथदिवे यावे हि मागणी गेल्या दोन वर्षा पुर्वी भाजपाचे सुनिल काळे यांनी केल्याने दिड वर्षा पुर्वी या रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन खडी करणाचे काम पुर्ण झाले होते. नंतर हा रस्ता किती मिटरचा यांवरूण स्थानिक रहिवाशी व सा बा विभागाचा वाद न्यायालयात पोहचल्याने या रस्त्याचे काम गेल्या दिड वर्षा पासुन थंड बस्त्यात पडले होते व या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर लागणाऱ्या मुरामाची वाहतूक याच रस्त्या वरून होत असल्यामुळे रस्त्यात ठिक ठिकाणी खड्डे पडले होते. तर ही या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने शहर भाजपाच्या वतीने खड्डे पुजन आंदोलन केले होते यांची दखल घेत सा बा विभागाचे अधिकारी रस्त्याची पुन्हा मोजनी केली होती तोच नागरिकानी रस्ता चौवीस मिटरचा कि सोळा मिटरचा हा वाद निर्माण झाला होता मात्र आ सजय सावकारे यांनी मध्यस्थी करून हा रस्ता सोळा मिटर चा होणार असून कामाला दोन दिवसात सुरू होणार असल्याचे सागीतले.