वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार ; जळगावातील घटना

एप्रिल 4, 2024 5:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२४ । जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण काही कमी होताना दिसत नसून अशातच भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव एमआयडीसीतील रेमंड चौकाजवळ घडली आहे. प्रणव प्रशांत कुदळे (वय २२ रा. तुळजाई नगर, कुसुंबा ता.जि.जळगाव ) असे मयत तरूणाचे नाव आहे.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

pranav jpg webp

जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील तुळजाई नगरात प्रणव प्रशांत कुदळे हा तरूण आई वडील यांच्यासोबत वास्तव्याला होता. शहरातील बॅनर लावण्याचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. दुचाकीने जळगावकडून कुसुंबा येथे जाण्यासाठी गुरूवार ४ एप्रिल रोजी रात्री १२.३० वाजता दुचाकीने निघाला होता. एमआयडीसीतील रेमंड चौकाजवळून जात असतांना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात प्रणवचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूची वार्ता कळताच आई वडील आणि बहिण यांनी एक आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई, वडील आणि विवाहित बहिण असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now