भडगाव

संर्पदंशाने २४ वर्षीय तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । भडगाव शहरातील पेट भागात राहणारा २४ वर्षीय तरूणाचा संर्पदंशाने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. राजू पाटील (वय२४) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी येथील पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

shock jpg webp

अधिक माहिती अशी की, राजू पाटील हा येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार १३ एप्रिल रोजी पाटील हा वडजी शिवारातील त्यांच्या शेतात गेला होता. शेतातील बांधावर गवत कापत असताना त्याच्या पायाला सापाने दंश केला. त्याला अत्यवस्थ वाटत असल्याने शेतातील काम करणाऱ्या नातेवाईकांनी खासगी वाहनाने भडगाव ग्रामीण रूग्णाालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान उपचार घेत असताना दुपारी ४ वाजता त्याचा मृत्यू झाला. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार कैलास गिते करीत आहे.

Related Articles

Back to top button