जळगाव शहर
राजकमल टॉकीज जवळ भला मोठा वृक्ष कोसळला
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२१ । शहरातील बेंडाळे चौकाजवळ असलेल्या राजकमल सिनेमा गृहाशेजारी असलेला भलामोठा चिंचेचा वृक्ष बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास अचानक कोसळला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
राजकमल टॉकीजच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत सुरक्षा भिंतीला लागूनच एक जुना चिंचेचा वृक्ष होता. बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास झाड अचानक रस्त्याच्या बाजूने कोसळले. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसून कोणालाही दुखापत झाली नाही.
वृक्षाखाली दबल्याने वस्तूंचे किरकोळ नुकसान झाले आहे. वृक्ष इतका मोठा आहे की त्याने जवळपास अर्धा रस्ता व्यापून घेतलेला आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी होत असून लवकरात लवकर वृक्ष न हटविल्यास रहदारी ठप्प होण्याची शक्यता आहे.