शेअर बाजारात सावरतोय, सेन्सेक्स पुन्हा 55 हजारांच्या पुढे, निफ्टीचीही तेजी
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद भारतीय शेअर बाजारावर देखील दिसून आले. काल गुरुवारी शेअर बाजारात तब्बल दोन वर्षातील सर्वात मोठी २७०० हुन अधिक अंकाची घसरण झाली होती. परंतु या मोठ्या घसरणीतून सावरत शेअर बाजाराने शुक्रवारी जोरदार पुनरागमन केले. बाजार उघडताच सेन्सेक्सने 55 हजारांची पातळी ओलांडली.
सुरुवातीच्या सत्रातच सेन्सेक्स 792 अंकांनी वाढून 55,322 वर उघडला आणि निफ्टीही 268 अंकांच्या मजबूत उसळीसह 16,515.65 वर उघडला. गुंतवणूकदारांनी आज जोरदारपणे शेअर्स खरेदी केले आणि सकाळी 9.30 वाजता सेन्सेक्स 1,152 अंकांच्या वाढीसह 55,678 वर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे निफ्टीही 357 अंकांनी वाढून 16,604 वर पोहोचला. तर ११ वाजेच्या सुमारास सेन्सेक्स तब्बल १६०० हुन अधिक अंकांनी वाढून तो ५६,१५२ वर पोहोचला.
सर्व क्षेत्रांत वाढ
गुंतवणूकदारांच्या सततच्या खरेदीमुळे एक्सचेंजमधील सर्वच क्षेत्रांत आज तेजी पाहायला मिळत आहे. विशेषत: पीएसयू बँक, मेटल, रिअल इस्टेटच्या निर्देशांकाने 4 टक्क्यांपर्यंत झेप घेतली आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपनेही जोरदार पुनरागमन केले असून ते 3 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. NSE वर PSU बँकेच्या समभागांनी 5 टक्क्यांपर्यंत उसळी मारली. एसबीआय, कॅनरा बँक, इंडियन बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनी जोरदार सुरुवात केली आहे.
आशियाई बाजारातही मजबूती दिसून आली
25 फेब्रुवारीच्या सकाळी आशियाई बाजारांनी जोरदार परतावा देऊन व्यवहार सुरू केले. सिंगापूरचे दोन एक्सचेंज 2.09 आणि 1.14 टक्क्यांनी वधारले, तर जपानचे निक्केई 1.54 टक्क्यांच्या उसळीसह व्यवहार करत होते. याशिवाय, तैवानच्या एक्सचेंजमध्ये 0.70 टक्के आणि दक्षिण कोरियामध्ये 1.13 टक्के मजबूत वाढ आहे.
हे देखील वाचा :
- इन्कम टॅक्स वाचवण्याचे 8 बेस्ट उपाय; फक्त आयकरच वाचणार नाही तर मिळेल भारी परतावा..
- स्टेट बँक ऑफ इंडियाची ४४४ दिवसांची लयभारी योजना; मिळणार भरघोस परतावा..
- Gold Price : जळगावच्या सुवर्णबाजारात घसरणीनंतर सोन्याच्या भावात पुन्हा वाढ
- तूरचा भाव प्रति क्विंटल 5 हजारांनी घसरला; शेतकऱ्यांना मोठा फटका
- मध्यमवर्गीयांसाठी ‘या’ आहेत पाच परफेक्ट कार; किंमतही बजेटच्या बाहेर जाणार नाही!