⁠ 
बुधवार, एप्रिल 17, 2024

मोठी बातमी : सावद्याजवळ अवैध गुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला, ४० गुरांची सुटका


Savda News । जळगाव लाईव्ह न्यूज । दिपक श्रावगे । सावदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सावदा फिल्टर हाऊस ते थोरगव्हाण गाव दरम्यान एका ट्रकमध्ये ४० गोवंश प्राण्यांची निर्दयपणे वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले असून ४० गुरांची गोशाळेत रवानगी केली आहे. याप्रकरणी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावदा येथील फिल्टर हाऊस ते थोरगव्हाण गाव दरम्यान दि.११ रोजी सकाळी ११.३० वाजे दरम्यान एम.पी.०४.जि.बी.९२९१ या ट्रकमध्ये अवैधरित्या गोवंश असणाऱ्या गुरांची वाहतूक होत असल्याची खबर मिळाल्यावरून पोलिसांनी सदर ट्रक अडवून तपासणी केली. ट्रकमध्ये 40 गोवंश निर्दयपणे कोंडून त्यांची वाहतूक करत असल्याचे आढळून आले. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला.


पोलिसांनी ट्रक सावदा येथे आणून त्यातील गौवंश हे गोशाळेत रवाना करण्यात येऊन ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ट्रक चालक मसुद बेग मतलब बेग वय-२७, धंदा-ड्रायव्हर रा. खेल वार्ड-११, कांधला रुरल, ता. किराणा, जिल्हा – शामली राज्य- उत्तर प्रदेश यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनचे पो.ना. यशवंत रमेश टहाकळे यांनी फिर्यादी दिली आहे.

सावदा पोलीस स्टेशनला गुरन २०२२, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनीयम १९६० चे कलम ११ (१) (ङ), (च), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनीयम १९७६ चे कलम ५,९,११ महा. पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९. महा. मोटार वाहन अधिनियम १९८९ चे कलम ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून यात २ लाख २७ हजार किंमतीची एकुण ४० गुरे तसेच १२ लाख किंमतीचा एक मालवाहु अशोक लेलॅण्ड कंपनीचा ट्रक असा एकूण १४ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पुढील तपास सावदा पो.स्टे. स.पो.नी. जालिंदर पळे यांचे मार्गदर्शना खाली हवालदार उमेश पाटील व सहकारी करीत आहे.