⁠ 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
Home | गुन्हे | भरधाव कारची दुचाकीला धडक; मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांचा जागीच मृत्यू

भरधाव कारची दुचाकीला धडक; मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांचा जागीच मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत असून अशातच नातेवाईकांना भेटण्यासाठी बाप-लेक दुचाकीने जात होते. मात्र रस्त्याने भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार वडिलांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील नेरी गावानजीक घडली घडली. या घटनेबाबत पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

समाधान वना चौधरी (वय ४० रा. वराड ता.धरणगाव) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. मजूरीचे काम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. रविवारी २० ऑक्टोबर रोजी दुपारी समाधान चौधरी हे आपला मुलगा दुर्गेश समाधान चौधरी (वय १४) यांच्यासोबत पहूर येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी वावडदामार्गे दुचाकीने जात असतांना नेरीगावानजीक समोरून येणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक (एमएच २० एफजी ५३६४) ने दुचाकीला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात दुचाकीस्वार समाधान चौधरी हे जागीच ठार झाले तर मुलगा दुर्गेश चौधरी हा गंभीर जखमी झाला. जखमी दुर्गेशला खासगी वाहनातून जळगावातील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. तर मयत समाधान चौधरी यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. प्रसंगी त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. याबाबत पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते. मयताच्या पश्चात आई मंगलबाई, भऊ, पत्नी कल्पना, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.