⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | गुन्हे | जळगावातील महामार्गावर पुन्हा अपघात; ट्रकच्या धडकेत महिलेचे दोन्ही पाय निकामी

जळगावातील महामार्गावर पुन्हा अपघात; ट्रकच्या धडकेत महिलेचे दोन्ही पाय निकामी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२४ । जळगाव शहरातून गेलेल्या महार्गावर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाहीय. अशातच किराणा साहित्य घेऊन घरी परतत असताना महिलेला भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे या महिलेच्या दोन्ही पायांचा चुराडा होऊन ते निकामी झाल्याची घटना इच्छादेवी चौकात घडलीय. ललिता प्रकाश सोनवणे (४७, रा. तांबापुरा परिसर) असे या जखमी महिलेचं नाव असून या महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.

चालक व ट्रक एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पती अपंग व सासू आजारी असल्याने या दोघांचा आधार असलेल्या ललिता सोनवणे या एका सुपर शॉपमध्ये कामाला आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. रविवारी ललिता या किराणा साहित्य घेऊन घरी परतत असताना आकाशवाणी चौकाकडून अजिंठा चौफुलीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने इच्छादेवी चौकातील सर्कलजवळ त्यांना जोरदार धडक दिली. यात ट्रकच्या पुढील चाकाखाली महिलेचे दोन्ही पाय आल्याने त्यांचा अक्षरशः चुराडा होऊन ते निकामी झाले आहेत.

घरची स्थिती बिकट, त्यात लाखोंचा खर्च
अपघात झाल्यानंतर महिलेचे नातेवाईक विवेकानंद बागुल व अन्य नागरिकांनी जखमी अवस्थेत महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. महिलेच्या पायांची स्थिती पाहता, तिला खासगी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, घरची आर्थिक स्थिती बिकट असल्याने लाखोंचा खर्च करणे शक्य नसल्याने या महिलेवर जीएमसी’तीलच आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.