महाराष्ट्रराजकारण
मोठी बातमी : सुषमा अंधारे यांचे पती शिंदे गटात जाणार
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२२ । सुषमा अंधारे यांचे पती शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ म्हणून अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेल्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना शिंदे गटाने मोठा धक्का दिला आहे. सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे अडसरकर यांचा आज शिंदे गटात प्रवेश होणार आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वैजनाथ वाघमारे यांचा प्रवेश होणार आहे. याच कार्यक्रमात अभिनेत्री दिपाली सय्यद यांचाही प्रवेश होणार आहे.