⁠ 

जळगाव जिल्ह्यात कोणाचे किती आमदार येणार ? सर्वात मोठा सर्व्हे आला समोर !

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२३ । महाराष्ट्रात झालेल्या अभूतपूर्व अश्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडाला एक वर्ष पूर्ण होत आहे. तर वर्षभरात विधानसभा निवडणूका होणार आहेत. अश्यावेळी जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सर्वे समोर आला आहे.

‘न्यूज अरेना’ या स्वायत्त संस्थेने हा सर्वे केला आहे. या सर्वेनुसार ठाकरे गटाला सर्वात होता धक्का बसणार असून गटाचा एकही आमदार येणार नाहीये. शिवसेनेचे ३ आमदार येणार आहेत. भाजपचे ६ तर राष्ट्रवादीचे ३ आमदार निवडून येणार आहेत.

https://twitter.com/NewsArenaIndia/status/1670098032241647616?s=20

अधिक माहिती अशी कि, चोपडा मतदार संघात शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहेत.रावेरमध्ये भाजपचा पुन्हा विजय होणार आहे. तर काँग्रेसचा पराभव होणार आहे. तर भुसावळ आणि जळगावमध्ये भाजप पुन्हा एकदा आपला गड कायम राखण्यात यशस्वी होत आहे.

जळगाव ग्रामीणमध्ये मंत्री गुलाबराव पाटील, जामनेरमध्ये मंत्री गिरीष महाजन जिंकतील असे सर्व्हेत सांगितले आहे. तर मुक्ताईनगरमध्ये मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीमध्ये आल्याने ती जागा राष्ट्रवादीला मिळेल असे या सर्व्हेमध्ये सांगण्यात आले आहे. (jalgaon political future)

अमळनेरमध्ये राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का बसणार असून भाजप याठिकाणी विजयी होत असल्याचे म्हटले आहे. चाळीसगाव आणि जामनेरमध्ये भाजपा पुन्हा एकदा विजयी पताका फडकावणार आहे.तर जळगाव शहरात पुन्हा कमळचं जिंकेल असे म्हटले आहे. ()