जळगाव जिल्हाजळगाव शहरराजकारण

मोठी बातमी : शिवसेनेच्या बैठकीचे स्थान बदलले ! आता ‘या’ ठिकाणी होणार बैठक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२३ । शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे २३ एप्रिल २०२३ रविवार रोजी जळगांव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. सर्वप्रथम पाचोरा येथे स्वर्गीय तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या स्मारकाच्या अनावरण करून मायकोरायझा लॅब उद्घाटन करतील व पाचोरा येथील जाहीर सभा घेणार आहेत.


मा.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जळगांव जिल्हा दौरा रूपरेषा व कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी व दौरा यशस्वी करण्यासाठी पाचोरा येथे जिल्हा बैठक संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, महापौर जयश्री महाजन, उप महपौर कुलभूषण पाटील, यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या बैठकीला संपर्कप्रमुख संजय सावंत हे मार्गदर्शन करणार असून या बैठकीला लोकसभेतील सर्व पदाधिकारी सर्व उपजिल्हाप्रमुख, संघटक, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख, तालुका संघटक, सह संघटक, शहर संघटक, पंचायत समिती सदस्य, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, शहर संघटक, समन्वयक, महिला आघाडी, युवा सेना, अल्पसंख्यांक आघाडी, विविध शिवसेना अंगीकृत असलेल्या संघटनातले सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे

असे आवाहन सहसंपर्क प्रमुख गुलlबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, दिपकसिंग राजपूत, प्रा. समाधान महाजन , वैशाली सूर्यवंशी-पाटील, महिला सघटीका महानंदा पाटील व महानगर प्रमुख शरद तायडे, युवा सेना, जिल्हा पदाधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button