⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

मोठी बातमी : तिळाचे दर १० हजारांवर‎, ३९ टक्केच उत्पादन‎

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । ३२२ किलाे तिळाचे उत्पादन हाेत आहे. अन्य‎ पीकांच्या तुलनेत भाव अधिक असला तरी उत्पादन कमी हाेत असल्याने‎ शेतकऱ्यांचा कल कमी झालेला आहे. जळगाव जिल्ह्यात चाेपडा, यावल,‎ भुसावळ, जळगाव, अमळनेर, पाचाेरा आणि जामनेर या तालुक्यात काही‎ प्रमाणात तीळ पेरणी केली जाते. रावेर, मुक्ताईनगर, बाेदवड, एरंडाेल,‎ धरणगाव, पाराेळा, भडगाव, चाळीसगाव तालुक्यात मात्र शेतकऱ्यांनी तीळ‎ या पीकाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

‎जळगाव‎ तेलबियांमध्ये माेठी मागणी‎ असलेल्या तिळाचे उत्पादन अाणि‎ पेरणी क्षेत्र माेठ्या प्रमाणावर घटले‎ अाहे. शेतकऱ्यांचा अाेढा नगदी ‎ ‎ पिकांकडे असल्याने गेल्या दहा‎ वर्षांत यात सातत्याने घट हाेत आहे. ‎ ‎ तीळ आयात करावी लागत असून, ‎ ‎ सध्या स्थानिक बाजारपेठेत तिळाचे‎ दर प्रतिक्विंटल १०,३०० रुपयांच्या ‎ ‎ उच्चांकावर आहे.

इतर कृषी‎ उत्पादनांमध्ये हे दर सर्वाधिक‎ असून, त्यात वाढ हाेऊ शकते.‎ देशभरात साडेचार लाख मेट्रिक‎ टन तिळाची मागणी असताना‎ गेल्या वर्षात केवळ १ लाख ७७‎ हजार मेट्रिक टनाचे उत्पादन झाले‎ आहे. राज्यातील जळगाव, धुळे,‎ लातूर, वाशिम, बुलडाणा, हिंगाेली‎ या तीळ उत्पादक जिल्ह्यात तिळाचे‎ क्षेत्र सातत्याने घटत आहे. जळगाव‎ जिल्ह्यात गेल्या २० वर्षांपूर्वी २५‎ ‎ हजार हेक्टरवर असलेले क्षेत्र सध्या‎ ३०० हेक्टरपेक्षा खाली आले आहे.

‎ काही प्रमाणात उन्हाळी तिळाची‎ पेरणी केली जात आहे. तिळाची‎ मागणी वाढलेली असताना त्या‎ प्रमाणात उत्पादन नसल्याने‎ बाजारपेठ सर्वस्वी आयातीवर‎ अवलंबून आहे. गेल्या चार वर्षांत‎ तिळाचे दर सतत वाढत आहेत.‎ चांगल्या दर्जाची पांढरी तीळ १२ ते‎ १३ हजार रुपये प्रतिक्विंटल रुपये‎ दराने मिळत आहे. चाेपडा कृषी‎ ‎ उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या‎ दाेन दिवसांमध्ये तिळाला सरासरी दर‎ १०,३०० रुपयांपर्यंत दर मिळाला ‎.‎ राज्यभरात ३ लाख हेक्टर क्षेत्र‎ तिळाचे राज्यभरात ३.७९ लाख‎ हेक्टर एवढेच पेरणी क्षेत्र आहे. ८० ते‎ ९० दिवसांमध्ये हे पीक हाती येत‎ असले तरी मान्सूनच्या‎ अनिश्चिततेने व नगदी पिकांच्या‎ ओढ्यामुळे शेतकऱ्यांनी तिळाकडे‎ पाठ फिरवली आहे. सध्या गुजरात,‎ मध्य प्रदेशात अधिक आवक आहे.‎