⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

मोठी बातमी ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बुधवारी नळ तोटी आंदोलन

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२२ । शहरांमधील जुन्या अपारमेंट धारकांना एक नळ कनेक्शन द्यावे या महापालिकेच्या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ऍड जमील देशपांडे यांच्या उपस्थितीत आज पद्मालय विश्रामगृह येथे बैठक झाली या वेळी शहरातील वीस अपार्टमेंट धारक उपस्थित होते.

या ज्वलंत प्रश्नांबाबत महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले जावे म्हणून दि२२/६/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता महापालिका ईमारती समोर नळ-तोटी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.जळगाव शहरामध्ये अमृत योजनेद्वारा मुबलक पाणी मिळणार असल्याची घोषणा महानगरपालिका प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी केली मात्र आत्तापर्यंत जुन्या अपार्टमेंट धारकांना नळ कनेक्शन मिळालेले नाही.जुने अपार्टमेंट धारकांना एकच कनेक्शन देण्यात येईल असे मनपा प्रशासन सांगत आहे. त्या द्वारे  सगळ्यांनी पाणीपुरवठा घ्यावा या महापालिकेच्या धोरणाविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामार्फत जळगाव शहरांमधील जुन्या अपारमेंट धारकांची बैठक आज रोजी पद्मालय विश्रामगृह येथे संपन्न झाली. 

 प्रत्येकाला पाणी मिळणे हा मूलभूत हक्क आहे. आणि या मूलभूत हक्काची पायमल्ली होत असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट जमील देशपांडे यांनी दिली आहे.नवीन अमृत योजनेची कनेक्शन न देता जुने पाणी कनेक्शन तोडल्या गेल्याचे गंभीर उदाहरण शहरांमध्ये आहेत. अनेक अपार्टमेंट  ला गुपचूप रित्या स्वतंत्र नळ कनेक्शन दिले असल्याची माहिती पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आहे .याबाबत मनपा प्रशासनाला जागे करण्याकरता व जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष वेधणे करता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नळ-तोटी आंदोलन करण्यात येईल असा ठराव आजच्या बैठकीत संमत करण्यात आला.

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट जमील देशपांडे शहराध्यक्ष विनोद शिंदे उपशहर अध्यक्ष आशिष सपकाळे रस्ते अस्थापना विभागाचे जिल्हा संघटक राजेंद्र निकम योगेश पाटील उपशहर अध्यक्ष संदीप पाटील, संदीप पांडुळे, महेश माळी, ललित शर्मा, अविनाश जोशी, सागर पाटील, साजन पाटील, विकास पाथरे उपस्थित होते..