मोठी बातमी : जळगाव जिल्ह्याला लवकरच मिळणार पालकमंत्री

सप्टेंबर 20, 2022 12:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज ।२० सप्टेंबर २०२२ । राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन तीन महिने पूर्ण झाले आहेत. तरीही अजून जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले नसल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वारंवार शाब्दिक चकमकी पाहायला मिळत आहेत. मात्र आता या आठवड्यात पालकमंत्री पदासाठीचा निर्णय होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अधिक महिती अशी कि, राज्य सरकार लवकरच पालकमंत्री पदाचा तिढा सोडवणार आहे.यामुळे पहिल्या टप्प्यात कॅबिनेट मंत्र्यांना दोन-दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे. तर मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर राज्यमंत्र्यांकडे एका-एका जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले जाईल. राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे. यामुळे लवकरात लवकर जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाला पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.यामुळे आता लवकरच जिल्ह्यांना पालकमंत्री मिळणार असे म्हटले जात आहे.

यातच जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार? या कडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे. कारण जिल्ह्णातील कित्येक कामे पालकमंत्र्यांअभावी रखडली आहेत. लवकरच जर निर्णय झाला तर मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन हे पालकमंत्रीपदासाठी आघाडीचे नेते आहेत. यामुळे या दोघांपैकी कोणीतरी जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री होईल असे म्हटले जात आहे. मात्र ठाकरे गटाला आव्हान द्यायला आणि शिंदे गट जिल्ह्यात वाढवायला जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हे मंत्री गुलाबराव पाटील यांना मिळू शकत असं म्हटलं जात आहे.

eknath shinde and devendra fadanvis

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now