मोठी बातमी : जळगावात गुलाबराव पाटील समर्थक रस्त्यावर, राऊतांचा केला निषेध

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२२ । ना. गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ जळगाव शहरामध्ये शिव कॉलनी जवळ राष्ट्रीय महामार्गावर गुलाबपाटील यांच्या समर्थक शिवसैनिकांनी पाटलांना पाठींबा देऊन संजय राऊतांचा तीव्र शब्दांत निषेध केला.

gulab patil jpg webp

यामध्ये गुलाबराव पाटील समर्थक शिवसैनिक सुनील ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले की, नामदार गुलाबराव पाटील यांनी गेल्या तीस वर्षांपासून शिवसेनेसाठी भरपूर काम केले आहे. त्यांच्या अंगावर छत्तीस केसेस आहेत. त्यांनी संपूर्ण जिल्हा नव्हेच तर उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना मजबुतीसाठी अहोरात्र काम केले. तसेच शिवसेनेचे संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केल्याबद्दल सर्व शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

यासाठी गुलाब पाटील यांच्या समर्थनार्थ त्रिमूर्ती कॉलेजचे संस्थापक मनोज पाटील, हॉटेल राधिकाचे संचालक भूषण पाटील, सचिन गोळबे, भरत पवार, संजय महाजन, गणेश राठोड, अमित तिवारी , राहुल पाटील, डॉ गजानन पाटील, ऍड सुनील पाटील, राहुल नवल पाटील, संदीप भालेराव, शेखर साळुंखे, प्रल्हाद महाजन आदी उपस्थित होते. या वेळेस सुनील ज्ञानेश्वर पाटील यांनी पोलिस प्रशासनाने केलेल्या अनमोल सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now