⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

मोठी बातमी : शेतकऱ्यांना ११८ कोटींची अंतिम नुकसान भरपाई मंजूर‎

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । जळगाव‎ प्रधानमंत्री पीक विमा योजनेतर्गत‎ खरीप पिकांची उत्पन्नावर आधारित‎ अंतिम नुकसान भरपाईची रक्कम‎ मंजूर करण्यात अली असून ११८.९७ कोटी‎ रक्कमेचे वाटप विमा कंपनीमार्फत‎ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा‎ करण्याचे काम सुरु असल्याचे‎ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी‎ संभाजी ठाकूर यांनी सांगितले.

‎ योजनेंतर्गत काढणी पश्चात‎ नुकसान दोन आठवड्यांच्या आत‎ म्हणजेच १४ दिवसात बिगर मोसमी‎ आलेल्या पावसामुळे झाल्यास‎ वैयक्तिकस्तरावर पंचनामे करुन‎ निकषांचे अधिन राहून नुकसान‎ भरपाई निश्चित करण्यात आली‎. पीक विमाधारक‎ शेतकऱ्यांच्या अधिसूचित पिकांचे‎ काढणीनंतर नुकसान झाल्यानंतर‎ असल्यास ७२ तासांच्या आत‎ झालेल्या नुकसानीची सूचना प्रथम‎ विमा कंपनीस देण्यात आली होती.‎ नुकसान भरपाईची रक्कम‎ मिळण्यास विलंब होत असल्याने‎ जिल्हा अधीक्षक कृषी‎ अधिकाऱ्यांना घेराव घातला होता.‎ त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी‎ अधिकारी कार्यालयाकडून विमा‎ कंपनीकडे पाठपुरावा करण्यात‎ आला आहे.

जिल्ह्याची सन‎ २०२१-२२ या वर्षाची खरीप पिकांची‎ एकूण नुकसान भरपाई १ लाख ४‎ हजार २७० शेतकऱ्यांना रुपये‎ १८४,९३ कोटी रक्कम विमा‎ कंपनीकडून मंजूर झालेली आहे.‎ जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा‎ योजना आयआयसी लोमबार्ड‎ जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत‎ राबवण्यात आलेली होती. शेतकरी‎ हिस्सा म्हणून २७.४८ कोटी रुपये‎ विमा कंपनीकडे भरण्यात आले‎ होते. या पूर्वी खरीप पिकांसाठी मिड‎ सिजनसाठी २७.७२ कोटी रुपये,‎ स्थानिक आपत्तीसाठी ३७.९८ कोटी‎ रुपये व काढणी पश्चात ०.२६ कोटी‎ रुपये असे एकूण ६५.९ कोटी रुपये‎ ९५ हजार ८२३ शेतकऱ्यांच्या बॅक‎ खाती आयसीआयसी लोमबार्ड‎ कंपनीकडून जमा केली आहे.‎