⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

धुळे, एरंडोल, चोपडा, शिरपूर आदी मार्गावरच्या बसेस विद्यापीठ प्रवेशव्दारावर थांबणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२२ । राज्य परिवहन विभागाने शहर बससेवाही सुरु करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर विभाग नियंत्रकांनी विद्यापीठाला पाठविलेल्या पत्रात जळगाव बसस्थानकातून धुळे, एरंडोल, चोपडा, शिरपूर आदी मार्गावर जाणाऱ्या व येणाऱ्या बसेस विद्यापीठ प्रवेशव्दारावर थांबवण्यात येणार आहे. संबंधित आगार व्यवस्थापकांना तशा सूचना देण्यात आल्या असल्याचे नमूद केले आहे.

विद्यापीठ प्रवेशव्दारावर सकाळी ८ ते १२ व सायंकाळी ४ ते ६.३० या वेळेत महिनाभरासाठी एक वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करुन त्यांच्याव्दारे प्रवाशी चढ उताराची नोंद करण्याचे आदेश जळगावच्या आगार व्यवस्थापकांना देण्यात आले आहे.

विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांना विविध प्रशाळेतील प्रवेशित विद्यार्थी शहरातून ये-जा करीत असतात. सद्यस्थितीत पूर्ण क्षमतेने प्रशाळांतील वर्ग सुरु झालेले आहेत. विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थी, नागरिक, पालक, महाविद्यालयीन कर्मचारी, प्राध्यापक, अभ्यागत यांची गैरसोय होऊ नये म्हणून ही बस सेवा पुर्ववत सुरु ठेवावी या मागणी करण्यात आली होती.