⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

मोठी बातमी : जिल्ह्यात पशुसंवर्धनची ७७ पदे रिक्त, १२ कंत्राटी पशुधन पर्यवेक्षकांना मिळणार मुदतवाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२२ । जिल्ह्यासह राज्यात सद्य:स्थितीत लम्पी स्किनचा प्रादर्भात मोठ्या प्रमाणात असून, जळगाव जिल्ह्यातच सुमारे २३ गुरांचा मृत्यू झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. लम्पी रोग नियंत्रणासाठी शासन पातळीवरून तत्काळ उपाययोजनांतर्गत पावले उचलण्यात आली आहेत.

मात्र जळगाव जिल्ह्यात पशुसंवर्धनची ७७ पदे रिक्त असल्याचे सांगण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील मुदत पर्यवेक्षकांना मुदतवाढ देण्यात आली असल्याने माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शशिकांत पाटील यांनी दिली.अश्यावेळी १२ पशुधन पर्यवेक्षकांची भरती करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात एक दोन तालुक्यात गेल्या एक दीड महिन्यांपासून लम्पी स्किन संसर्ग प्रादुर्भाव होता. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने सतर्कतेने पशुधनाचे रिंग पद्धतीने लसीकरण मोहीमेसह गोठा स्वच्छता मोहीम राबविली. असे असले तरी ग्रामीण भागात निर्बंध असूनही बऱ्याच लम्पी स्किनचा प्रादुर्भाव मुख्यत्वेकरून गोवंशीय प्राण्यांना विषाणूजन्य आजार आहे.

या रोगाची साथ राजस्थान, गुजरात, पंजाब, मध्यप्रदेशसह अन्य राज्यात पसरली आहे. राज्यात सर्वप्रथम ४ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील चिनावल या गावामध्ये लम्पी साथ रोगाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वाशिम, नाशिक, जालनासह अन्य २१ जिल्ह्यात या साथरोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.