⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

महसूल आणि महावेदच्या आकडेवारीत मोठी तफावत : शेतकऱ्यांचे हाल

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२२  गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये अनियमित पाऊस होत आहे. यामुळे शेतात पाणी शिरले आहे. पर्यायी कापूस, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले आहेत. मात्र या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करण्यात मोठी अडचण येत आहे. कारण महसूल आणि महावेद पर्जन्यमानात प्रचंड तफावत आढळून येत आहे.

गेल्या काही दिवसात अमळनेर आणि पारोळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. शेतांमध्ये पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी नाले वाहू लागले आहेत. कित्येक नाल्यांना मोठा पूर आल्याने गावात पाणी शिरले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार शेवाळे मंडळात 80 मिलिमीटर पाऊस झाला. तर महावेदच्या आकडेवारीनुसार त्याच ठिकाणी ३३.५ टक्के पाऊस झाला.

आदल्या दिवशीच्या आकडेवारीत देखील मोठी तफावत दिसून येत आहे. महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार ६३ मिलिमीटर पाऊस झाला तर महावेदच्या आकडेवारीनुसार मध्ये केवळ 31 मिलिमीटर पाऊस झाला. नियमानुसार जर 65 मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस झाला तर नैसर्गिक आपत्ती ग्राह्य धरली जात नाही. मात्र या दोघांच्या तफावतीमुळे शेतकऱ्यांचे हाल झालेले पाहायला मिळत आहेत.

दुसरीकडे अमळनेर तालुक्यात देखील हाच प्रकार निदर्शनास आला आहे. महसूलच्या नोंदणी प्रमाणे 31 मीटर पाऊस झाला. मात्र महावेदच्या आकडेवारीनुसार केवळ १ मिलिमीटर पाऊस झाला. शिरूर मंडळात देखील असाच प्रकार बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांना पीक विमा देताना महावेदची पर्जन्यवृष्टी मोजली जाते आणि ती कमी दाखवली गेल्याने शेतकऱ्यांच्या पंचनामे पण होत नाहीयेत. याच बरोबर नुकसान भरपाई देखील मिळत नाही. यामुळे शेतकरी प्रचंड नाराज झाले आहेत