युद्धाची झळ : LPG सिलिंडर बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता पाहावी लागणार ‘इतके’ दिवस वाट?

मार्च 9, 2026 1:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२६ । अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाची झळ भारतीय नागरिकांना बसताना दिसत असून दोन दिवसापूर्वी घरगुतीसह व्यावसायिक गॅस सिलिंडर दरात मोठी वाढ करण्यात आली. त्यातच आता एलपीजी सिलिंडर रिफिल करण्याचे नियम बदलण्यात आले आहेत. या नियमानुसार तुम्हाला एक सिलिंडर खरेदी केल्यानंतर लगेच दुसरा सिलिंडर मिळू शकणार नाही. काय आहेत तो बदल जाणून घेऊयात..

gas booking

प्रशासनानं घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर रिफील नियमांमध्ये बदल केले आहेत. हे बदल जागतिक स्थिती पाहून करण्यात आले आहेत. यापूर्वी गॅसचा सिलिंडर बूक केल्यानंतर दुसरा सिलिंडर बूक करण्यासाठी १५ दिवसांचा वेटिंग टाईम होता. आता नव्या नियमानुसार या वेटिंग टाईम वाढवण्यात आला आहे. नव्या नियमानुसार आता एका बुकिंगनंतर दुसरा सिलिंडर बूक करण्यासाठी १५ दिवसांऐवजी २१ दिवस वाट पहावी लागणार आहे.

आतापर्यंत, पहिला सिलिंडर घेतल्यानंतर १५ दिवसांनी दुसरा सिलिंडर खरेदी करता येत होता. मात्र आता २१ दिसानंतर दुसरा सिलिंडर मिळणार आहे. यामागील कारण म्हणजे खऱ्या घरगुती ग्राहकांना प्राधान्याने पुरवठा सुनिश्चित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. नव्या नियमानुसार जरी वेटिंग टाईम वाढला असला तरी बुकिंगच्या प्रक्रियेत कोणाताही बदल करण्यात आलेला नाही.

वर्षाला १५ सिलिंडर

तेल कपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरसाठी काही नियमावली सेट केली आहे. या नियमानुसार प्रत्येक ग्राहकाला १२ सबसिडाईज सिलिंडर आणि अतिरिक्त नॉन सबसिडाईज सिलिंडर प्रत्येक वर्षी मिळतात. याचा अर्थ १ एप्रिल ते मार्च ३१ पर्यंत एका गॅस कनेक्शनवर वर्षाला एकूण १५ गॅस सिलिंडर मिळू शकतात.

२४ तासाच्या आत सिलिंडर डिलिव्हरी नियम

तेल कंपन्यांनी एजन्सीला गॅस सिलिंडर बुकिंग केल्यानंतर ते २४ तासाच्या आत सिलिंडर देणं बंधनकारक केलं आहे. या नियमामुळं देशातील अनेक गॅस सिलिंडर ग्राहकांची मोठी सोय झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now