⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | बिग ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात कोट्यवधींची ब्राऊन शुगर पकडली, दोघांना अटक

बिग ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात कोट्यवधींची ब्राऊन शुगर पकडली, दोघांना अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । जळगाव जिल्हा अंमली पदार्थ तस्करीचा अड्डाच आहे कि काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने रावेर शहरातून आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधींची किमत असलेले ब्राऊन शुगर जप्त केले आहे. परराज्यातील दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीवरून अटक केली असून संशयीताकडे प्रतिबंधीत ड्रग्ज ब्राऊन शुगर असल्याची दाट शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर येथे पर राज्यातून अंमली पदार्थ आणले जाणार असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाल्यानुसार त्यांच्यासह पथकाने सकाळी सापळा रचला होता. माहितीनुसार संशयीत आल्यानंतर पथकाने त्यांच्याकडील कोट्यवधी रुपये किंमतीची ब्राऊन शुगर जप्त केली आहे. पोलीस यंत्रणेकडून जप्त ब्राऊन शुगरची मोजणी सुरू असून घटनास्थळी पंचनामा करण्यात येत आहे. सायंकाळपर्यंत रावेर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील गांजा प्रकरण, गावठी कट्टे प्रकरण ताजे असतांनाच ब्राऊन शुगर प्रकरण समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्हा अंमली पदार्थ तस्करीचा अड्डाच आहे कि काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पोलिसांनी आज केलेल्या कारवाईत माल कुणाकडे येणार होता आणि तिथून कुठे जाणार होता? याचा पोलिसांनी छडा लावणे गरजेचे आहे. आज मिळालेली ब्राऊन शुगर ३१ डिसेंबरच्या पार्टीची तयारी तर नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(आम्ही आता देत असलेली बातमी नुकतेच ब्रेक झाली आहे. ताजी बातमी सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. बातमी संदर्भातील इतर मिळणारी माहिती आम्ही लवकरच या बातमीत अपडेट करणार आहोत. बातमीची लिंक पुन्हा रिफ्रेश करून पहावी.)

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.