जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात शहरातील एका १८ वर्षीय तरुणानं थेट तापी नदीत उडी घेत जीवनयात्रा संपविली. अक्षय नीलेश चौधरी (वय १८) असं आत्म#$ हत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्या आधी पुलावरून मित्राला व्हीडीओ कॉल करत तापीनदीत उडी घेतोय, असे सांगितले.

याबाबत असे की, अक्षय चौधरी भुसावळ शहरातील शनिमंदिर वार्डातील रहिवाशी आहे. अक्षयच्या वडिलांची वडापावची गाडी आहे. दरम्यान अक्षय चौधरीने सकाळी पायीच तापी नदीचा पूल गाठला. तेथून मित्र विजय बोदडे याला व्हीडीओ कॉल करून मी नदीत उडी मारत आहे असे सांगत मोबाइल बंद केला. नंतर पुलावर मोबाइल ठेऊन तेथेच चप्पल काढली.

कोणाला काही कळायच्या आत पुलावरून ये-जा करणाऱ्यांसमोर खाली नदीत उडी मारली. हा प्रकार कळताच पुलावर गर्दी झाली. भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार युनुस शेख, शेखर तडवी यांनी पोहणाऱ्यांशी संपर्क साधला. मुलाने तापीत उडी घेतल्याने चौधरी कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते.









