उद्या भुसावळ-वर्धा, बडनेरा-नाशिक रेल्वे गाड्या रद्द ; कारण जाणून घ्या?
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२४ । भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जलंब शेगाव दरम्यान आवश्यक – कामासाठी रेल्वे प्रशासनाने ८ ऑगस्टला ब्लॉक घेतला आहे. यामुळे भुसावळ वर्षा मेमू, बडनेरा- नाशिक विशेष या दोन्ही गाड्यांची अप-डाऊन फेरी होणार नाही. याशिवाय चार गाड्या या विविध स्थानकांवर अर्धा ते दीड तास थांबवल्या जाणार आहेत.
जलंब शेगाव दरम्यान रेल्वे प्रशासनाने कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी गुरुवारी (दि.८) सकाळपासूनच या मार्गावर नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक घेतला आहे. परिणामी रेल्वे दळणवळणाला फटका बसला. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक भाविक प्रत्येक गुरुवारी शेगाव येथे संत गजानन महाराज दर्शनासाठी जातात. शिवाय नाशिक बडनेरा विशेष गाडीने प्रवास करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. पण, ब्लॉकमुळे सर्वांची अडचण होईल
रद्द केलेल्या गाड्या
भुसावळ – वर्षां मेमू ८ ऑगस्ट, तर वर्धा भुसावळ मेमू ९ ऑगस्टला रद्द आहे. तसेच ८ ऑगस्टला बडनेरा – नाशिक आणि नाशिकहून बडनेरा गाडी सुटणार नाही.
या गाड्यांना असेल थांबा
ओखा पुरी एक्स्प्रेस ७ ऑगस्टला भुसावळ विभागात १.३० तास, गोंदिया कोल्हापूर एक्सप्रेस ८ ऑगस्टला १.१० तास, नांदेड – श्रीगंगानगर एक्स्प्रेस ८ रोजी ३० मिनिटे, बडनेरा – भुसावळ मेमू ८ रोजी ४५ मिनिटे.