⁠ 
शनिवार, जुलै 20, 2024

शेतकऱ्यांवर अवकाळीचे ढग ; आज जळगावसह अनेक जिल्ह्यांना ”यलो अलर्ट” जारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२४ । राज्यावर आलेलं अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. एकीकडे रब्बी पिकांची काढणी सुरु असून अशातच आज राज्यातील जळगावसह काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, वेस्टर्न डिस्टबर्न्सच्या प्रभावामुळे देशासह महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल झाला असून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशातच पुन्हा पावसाची हजेरी दिसून येणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

या जिल्ह्यांना अलर्ट
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट दिला आहे. त्यात जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर शहराचा समावेश आहे. त्यानंतर दोन मार्च रोजी जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यास यलो अलर्ट दिला आहे. तीन मार्च रोजी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट असणार आहे.