⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

सावधान : जिल्ह्यात आढळले तब्बल ‘इतके’ कोरोना रुग्ण

जळगाव लाईव्ह न्यूज : १७ मार्च २०२३ : राज्यातून कोरोना हद्दपार झाल्या असल्याचे म्हटले जात असतानाच नागरिकांना आणि आरोग्य यंत्रणेला सावधान करणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

अधिक माहिती अशी कि, भुसावळ जिल्ह्यात 25 ऑक्टोंबर 2022 रोजी कोरोनाचे दोन रुग्ण आढळले होते व त्यानंतर कोरोना नियंत्रणात आल्याचा दावा आरोग्य यंत्रणेने केल्यानंतर शहरवासी बिनधास्त झाले होते मात्र आता एका नर्सचा रॅपीड टेस्ट अहवाल पॉझीटीव्ह आला असून मुंबईहून आलेल्या एका शहरवासीचा आरटीपीसीआर अहवाल पॉझीटीव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

भुसावळ शहरात कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्यानेे शहरवासीयांची चिंता वाढली आहे तर आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एका नर्ससह शहरातील एकाचा कोरोनाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. आरोग्य यंत्रणेने नागरीकांना घाबरून न जाता सुरक्षित अंतर राखण्यासह मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना नियंत्रणात आला असतातरी संपलेला मात्र नसताना नागरीक बाजारातील गर्दीत फिजीकल डिस्टन्स ठेवत नाहीत शिवाय मास्क वापरत नाहीत तसेच बदलत्या वातारणाचा परीणामही आरोग्यावर जाणवत आहे. दरम्यान, कोरोना पॉझीटीव्ह दोन्ही रुग्णांना कॉरंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.