⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

प्रवाशांनो लक्ष द्या ; भुसावळ-कटनी पुढील दोन दिवस ‘या’ स्थानकापर्यंत धावणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । भुसावळहुन मेमूने इटारसीकडे प्रवेश करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे भुसावळ‎ ११०७७ भुसावळ-कटनी ही गाडी‎ गुरुवार व शुक्रवारी (७ व ८ जुलै)‎ कटनी ऐवजी केवळ खंडवा‎ स्थानकापर्यंत धावणार आहे. तर‎ बुधवार व गुरुवारी (६ व ७ जुलै )‎ ११११६ व ११११६ भुसावळ-इटारसी‎ मेमू रद्द करण्यात आली आहे.‎ यामुळे भुसावळातून सावदा, रावेर,‎ बऱ्हाणपूर येथे अप-डाऊन‎ करणाऱ्या नोकरदारांची गैरसोय‎ होणार आहे.

तर कटनीपर्यंत‎ जाणाऱ्या प्रवाशांना केवळ‎ खंडव्यापर्यंत प्रवास करता येईल.‎ भुसावळ स्थानकातून सुटणारी‎ ११०७७ भुसावळ-कटनी एक्सप्रेस‎ गाडी ७ व ८ जुलै रोजी कटनी‎ स्थानकाऐवजी केवळ खंडवा‎ स्थानकापर्यंत धावेल. परतीच्या‎ प्रवासात ११०२८ कटनी-भुसावळ‎ एक्सप्रेस खंडवा येथून तिच्या‎ नियोजित वेळेवर सुटेल. दोन दिवस‎ खंडवा ते कटनीदरम्यान एक्स्प्रेस रद्द‎ होईल.

तर ११११५ भुसावळ-इटारसी‎ मेमू बुधवार व गुरुवारी रद्द केली‎ आहे. परतीच्या प्रवासात मेमू क्रमांक‎ ११११६ इटारसी-भुसावळ मेमू गाडी‎ ७ व ८ जुलै रोजी रद्द राहील.‎ प्रवाशांनी या नुसार नियोजन करावे,‎ असे प्रशासनाने कळवले आहे.‎