⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | भुसावळ मंडळ सल्लागार समितीची बैठक, पाचोरा स्टेशन वरील समस्यांचा वाचला पाढा!

भुसावळ मंडळ सल्लागार समितीची बैठक, पाचोरा स्टेशन वरील समस्यांचा वाचला पाढा!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२२ । भुसावळ मंडळातील सल्लागार सदस्यांची बैठक काल शुक्रवारी घेण्यात आली. यात सदस्यांनी रेल्वे स्टेशनवरील समस्या भुसावळ मंडळाचे मंडळ रेल प्रबंधक एस. एस. केडिया यांच्यासमोर मांडल्या. केडिया यांनी सर्वच सदस्यांना लेखी स्वरूपात उत्तर दिले. यावेळी १४ सदस्यांमधून एका सदस्याची ZRUCC सदस्यासाठी गुप्त चिठ्ठी मतदान पद्धतीने मत घेण्यात आली. यात वसंत बाच्छुका, अकोला यांची ZRUCC म्हणून निवड करण्यात आली.

भुसावळ मंडळातील पाचोरा येथील दिलीप पाटील यांनी पाचोरा स्टेशन वरील समस्यांचा सूचना देत ईतर समस्यांचा पाढा वाचला. यात मुख्यत्वे इगतपूरी भुसावळ मेमू ट्रेन सकाळी नाशिक, चाळीसगांव, पाचोरा, जळगांव, अशी सूरू व्हावी, पाचोरा जंक्शन वर स्यांचलित जिना एस्केलेटर, स्टील रेलिंग, कोच पोजिशन इंडिकेटर, कोच पोजिशन अनौन्समेंट, मेन तिकिट घर चे छत लिकेज, भुसावळ मुंबई पॅसेंजर सुरू व्हावी, दैनंदिन प्रवाश्यांसाठी MST बोगि लावली जावी, महाराष्ट्र एक्सप्रेस पूर्वनिर्धारित वेळेवर व्हावी अशा समस्या मांडत यातील बहुतांश कामे तात्काळ मार्गी लागतील असे लेखी स्वरूपात मंडळ रेल प्रबंधक एस. एस. केडीया यांनी दिले.

यावेळी समितीचे सदस्य खंडेराव साळुंखे चाळिसगाव, दिलीप पाटील पाचोरा, महेंद्रकुमार बुरड, किरण राणे जळगांव, सुरेश रतावा अमरावती, वसंत बाच्छुका अकोला, गणेश शिंदे नांदगाव, जगदिशप्रसाद तिवारी खामगांव, किरण बोरसे नाशिक, उन्मेष मालू अकोला, संदीप पुंडकर अकोला, नितीन देवरे धुळे, अजय अयरे बुऱ्हाणपूर, दिवाकर शिंदे शेगांव, सह भुसावळ रेल्वे मंडळाचे एस. एस. केडिया, मंडल रेल प्रबंधक, नवीन पाटील, अपर मंडल रेल प्रबंधक (Technical) रुकमैय्या मीणा, अपर मंडल रेल प्रबंधक (Admin ), डॉ संजीव एन.के, मुख्य चिकित्सा अधीक्षक, व वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक चे शिवराज पी. मानसपुरे, आर. के. शर्मा सी वी कदम, एम. पी. खोब्रागडे, जे पालटा सिंह, पी. के. भंज, हिमांशु रामदेव, अरशद आलम खान, तरूण दंडोतिया राहुल अग्रवाल, योगेश गरड, किशोर सिंह, उमेश खरात, निशांत के व्दिवेदी, मोहित मांडलेकर, एस. एन. काजी, एच. वी. सुमंत, क्षितिज गुरव, कार्तिकेय गडाख, आदी उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह