शेअर्स ट्रेडिंगचे आमिष देऊन भुसावळच्या प्रौढाला लावला १९ लाखांचा चुना

डिसेंबर 6, 2025 11:29 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । सायबर ठगांकडून होत असलेल्या फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. यात ऑनलाइन शेअर्स ट्रेडिंगमध्ये चांगल्या नफ्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडविले जात असून अशीच एक घटना भुसावळातून समोर आलीय. ज्यात शेअर्स ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका नागरिकाची १९ लाख रुपयांहून अधिक रकमेची आर्थिक फसवणूक करण्यात आली. नत्थू प्रजापती प्रसाद (वय ४९, रा. भुसावळ) यांनी यासंबंधी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

jalgaon mahanagar palika 26

फिर्यादी नत्थू प्रसाद यांच्या तक्रारीनुसार, ९ ऑगस्ट २०२५ ते २४ नोव्हेंबर या दरम्यान ही फसवणूक करण्यात आली. त्यांना ५५७ एस-के स्ट्रॅटेजी क्लब आणि डी३ स्ट्रॅटेजिक ट्रेडिंग ग्रुप नावाच्या ग्रुप्समध्ये सामील करण्यात आले. या ग्रुप्सवरील प्रीती यादव आणि नीता जैन नावाच्या दोन महिला आणि ग्रुपचा अॅडमिन अॅडम सॅमनिओटिस यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

शेअर्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास भरघोस नफा मिळेल, असे खोटे आश्वासन देऊन त्यांनी नत्थू प्रसाद यांच्याकडून वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांत ऑनलाइन पद्धतीने पैसे स्वीकारले. या आश्वासनांवर विश्वास ठेवून फिर्यादीने एकूण १९ लाख १ हजार ९९९ रुपये इतकी मोठी रक्कम आरोपींना दिली. मात्र, पैसे स्वीकारल्यानंतर आरोपींनी नत्थू प्रसाद यांना कोणताही नफा किंवा मूळ रक्कम परत केली नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now