⁠ 
बुधवार, मे 8, 2024

चार हजारांची लाच भोवली, पिंपळगाव हरेश्वरचा हवालदार एसीबीच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२२ । पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यातील हवालदार राकेश खोंडे यांना चार हजारांची लाच स्वीकारताच जळगाव एसीबीने अटक केली. दरम्यान, यामुळे पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाणे हद्दीतील तक्रादार शेतकर्‍याने वर्षभरापूर्वी बैलगाडी भाड्याने दिल्यानंतर संबंधितानी ती परत दिली नाही उलट या प्रकरणात तक्रारदारावरच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शेतकर्‍याने तक्रार दाखल केली. या सर्व प्रकरणानंतर तक्रारदाराला बैलगाडी परत मिळवून देण्यासाठी पिंपळगाव हरेश्वरातील पोलिस हवालदार राकेश खोंडे यांनी पाच हजारांची लाच मागितली मात्र तक्रारदाराकडे चार हजार असल्याने त्यावर तडजोड झाली.

तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची मंगळवारी पडताळणी झाल्यानंतर पाचोरा शहरातील एका चौकात तक्रारदाराला बोलावण्यात आल्यानंतर सापळा रचण्यात आला. एका चहाच्या टपरी व्यावसायीकाकडे लाचेची रक्कम देण्याचे सांगितल्यानंतर पथकाने आधी पाटील नामक चहा व्यावसायीकाला व नंतर आरोपी हवालदार राकेश खोंडे यास अटक केली. विशेष म्हणजे आरोपी हवालदार हा रजेवर असल्याची माहिती आहे.