मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा ! १७ फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश

फेब्रुवारी 18, 2022 10:13 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२१ । पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची पत्नी मंदाकिनी यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा मिळाला आहे. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ईडीला यापुढे मंदाकिनी खडसेंची चौकशी करावयाची असल्यास 24 तास आधी नोटीस देण्याचे निर्देश देण्यात आलेत. तसेच 17 फेब्रुवारीपर्यंत कुठलीही कठोर कारवाई करू नये, असे आदेश न्यायालयाने ईडीला दिले आहेत.

mandakini khadse

सुनावणीत ईडीनं याप्रकरणी आपलं अतिरिक्त प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं. या प्रकरणातील आरोपी मंदाकिनी खडसे यांना यापूर्वीच हायकोर्टानं अंतरीम दिलासा दिलेला आहे. (Eknath Khadse in land scam)

काय आहे प्रकरण?
एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी 28 एप्रिल 2016 रोजी भोसरी एमआयडीसी येथे जमीन घेतली आहे. ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या सर्व व्यवहारात सुमारे 61 कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाले. हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ईडीला संशय आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now