⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

भीमशाहीर हरपला..आज मुक्ताईनगरात अंत्यसंस्कार

जळगाव लाईव्ह न्युज । सुभाष धाडे । वंचित समाजाला जागृत करण्याचे कार्य करणारे लोकशाहीर प्रतापसिंग बोदडे (वय ७४) यांचे शुक्रवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मुळगावी मुक्ताईनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

‘भीमराज कि बेटी मै तो जय भीम वाली हू,’ ‘भीम युगाचं तांबडं फुटलं, या देवाचं गिऱ्हाणं फिटलं..’ यासारख्या अनेक अजरामर भीमगीतांमधुन वंचित, उपेक्षित समुहाला जागृत करण्याचे काम केले. मुंबई येथुन रेल्वेतुन निवृत्ती घेतल्यानंतर ते मुक्ताईनगर या मुळ गावी वास्तव्यास होते. लोककवी विमन कर्डक या़चे ते पट्टशिष्य होते. औरंगाबाद मधील मिलिंद महाविद्यालयात त्यांनी एमए इंग्रजी चे शिक्षण पुर्ण केले. मराठी,हिंदी, इंग्रजी आणि उर्दु या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी शेकडो भीमगीतांचे कार्यक्रम सादर केले. खान्देशच्या मातीतला हा लोकप्रिय लोककवी आणि लोकशाहीर आयुष्यभर वंचितांच्या वेदना शब्दबध्द करीत गात राहीला.चार हजाराच्या पार गाणीही त्यांनी लिहीले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, चार मुली आहेत.गायक कुणाल व रागिनी बोदडे यांचे ते वडील आहेत.