जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२२ । लातूर येथे एप्रिल महिन्यात झालेल्या राज्यस्तरीय ७९ युथ मेन्स महाराष्ट्र स्टेट बाॅक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत, भुसावळ येथील भावेश संजय ठाकूर याने रौप्य पदक पटकावले.
७९ युथ मेन्स महाराष्ट्र स्टेट बाॅक्सिंग चॅम्पियन २०२१-२२ ही राज्यस्तरीय स्पर्धा, लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात झाली होती. या स्पर्धेत भुसावळ येथील भावेश संजय ठाकूर चमकदार कामगिरी केली. सम्राट बाॅक्सिंगचे काेच प्रकाश जाधव व सहकारी आनंद घुसळे, संजय सुरवाडे, संताेष पिल्लेवार, नागेश शिंदे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. तसेच वेलनेस फिटनेस जिमचे संचालक जयेश चाैधरी यांनी सहकार्य केले. भावेश याने यापूर्वीही जिल्हास्तरीय आणि विभागीय स्पर्धेत सहभाग घेऊन पारिताेषिके मिळविली आहे. त्याच्या यशाबद्दल सर्वत्र काैतुक हाेत आहे. आगामी काळातील स्पर्धांसाठी तो तयारी करत आहे. यशाबद्दल त्याचे कौतुक होत आहे.