राष्ट्रीय एकल गायन स्पर्धेत भावेश जाधवचे यश

मार्च 26, 2026 5:45 PM

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात आनंदोत्सव

bhavesh jadhav

जळगाव लाईव्ह न्यूज । येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयातील व्दीतीय वर्षातील विदयार्थी भावेश जाधवने एकल गायन स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. त्याच्या या यशानंतर महाविद्यालयात आनंदोत्सव साजरा होत असून अधिष्ठाता डॉ.प्रशांत सोळंके यांनी भावेशचे अभिनंदन केले आहे.

शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील कलासंगम स्नेहसंमेलनात गायन वादन स्पर्धेत राज्यातील ३१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला या डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचा भावेशने १९६८ साली प्रदर्शित झालेल्या इज्जत या चित्रपटातील गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेले ये दिल तुम बिन गाणे सादर करीत प्रथम क्रमांक पटकावला त्याला ट्रॉफी व रोख ५०००/— बक्षीस देण्यात आले.

त्याच्या या विजयाबददल गोदावरी फॉउंडेशनचे अध्यक्ष माजी खा.डॉ.उल्हास पाटील,सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी आनंद व्यक्त करीत अभिनंदन केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now