गुन्हेजळगाव जिल्हा

भरधाव दुचाकींचा समोरा-समोर धडक, दोघे गंभीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२२ । भरधाव दुचाकी समोरा-समोर धडकून झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. छोटू केसर बारेला (वय 32) व अब्दुल हफिस अब्दुल हमीद (वय 45) असे गंभीर झालेल्या अपघातीचे नाव आहे. हा अपघात यावल-फैजपूर रस्त्यावरील सांगवी जवळील पेट्रोलजवळ गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास झाला. जखमींवर जळगावात उपचार सुरू आहेत.


सविस्तर घटना अशी की, यावल-फैजपूर रस्त्यावरील सांगवीजवळ पेट्रोल पंपाजवळ गुरूवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दुचाकी (क्रमांक एम.एच.15 बी.बी.8833) द्वारे छोटू केसर बारेला (32, रा.चोपडा) हे यावलकडून फैजपूरकडे जात असताना समोरून दुचाकी (क्रमांक एम.एच.39 एक्स.0576) वरून अब्दुल हफिस अब्दुल हमीद (45, रा.मन्यार गली, चोपडा) हे फैजपूरकडून यावलकडे जात असताना दुचाकी धडकल्याने दोघे गंभीर जखमी झाले. साकळी येथील युनूस मन्सुरी व त्याचे मित्र मंडळींनी तातडीने दोघा गंभीर जखमींना उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावलचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला, अधिपरीचारीका दीपाली किरंगे, शुभम पाटील, अमोल अडकमोल, सोनाली देशमुख, मानसी उंबरकर, मुराद तडवी, निरज झोपे, बापू महाजन, दुर्गेश पाटील, फारूक तडवी, प्रवीण बारी आदींनी प्रथमोपचार केले. यातील अब्दुल हाफिज यांची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच फैजपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या सूचनेवरून घटनास्थळावर हवालदार देविदास सुरदास, राजेश बर्‍हाटे, पोलीस नाईक महेंद्र महाजन यांनी भेट दिली दोघं वाहने त्यांनी ताब्यात घेतली.

Related Articles

Back to top button