शरद पवार गटाला धक्का! भंवरखेडे येथील कार्यकर्त्यांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

जुलै 22, 2024 5:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । धरणगाव तालुक्यातील भंवरखेडे येथील राष्ट्रवादी शरद पवार गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

ncp leader join Shiv Sena jpg webp

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी भंवरखेडे गावात मागील काही दिवसात कोट्यावधीची विकास कामे मार्गी लागली आहेत. तर बरेच विकास कामे प्रस्तावित आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत आज प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या गळ्यात शिवसेनेचा रुमाल गळ्यात टाकून स्वागत केले. दरम्यान, विकास कामांनी आमच्या गावाची कायापालट झाल्यामुळे गुलाबभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आम्ही प्रवेश केल्याची प्रतिक्रिया भंवरखेडे येथील कार्यकर्त्यांनी दिली.

यांनी केला प्रवेश !
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उपतालुकाध्यक्ष गिरीश पाटील, शांताराम पाटील, मुरलीधर पाटील, किशोर पाटील, प्रदीप पाटील, भूषण महाजन, ग्रा.प. सदस्य विजय पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका सरचिटणीस ज्ञानेश्वर पाटील, प्रदीप पाटील, अशोक पाटील, विजय दयाराम पाटील, बाबूलाल पाटील, पांडुरंग पाटील, समाधान पाटील, भरत पाटील, उमेश पाटील, महेश पाटील यांच्यासह अनेक राष्ट्रवादीच्या कट्टर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यांची होती उपस्थिती
यावेळी तालुकाप्रमुख डी.ओ. पाटील, सचिन पवार, युवासेना उपतालुका प्रमुख तथा भंवरखेडे गावाचे सरपंच उगलाल पाटील, महेश पाटील, सतीश पाटील, स्वप्नील पाटील, नितीन पाटील, महेश पाटील,सुनील पाटील, किशोर पाटील, बंटी पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now