---Advertisement---
मुक्ताईनगर

एकाच जागेवर तीन घरकुलांसह गायगोठ्याचा लाभ ; मुक्ताईनगर तालुक्यातील प्रकार

---Advertisement---

जळगांव लाईव्ह न्युज | सुभाष धाडे | मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा येथील ग्रा.पं. उपसरपंच व विद्यमान प्रभारी सरपंच एकाच जागेवर परिवारातील तिन सदस्यांना घरकुलाचा लाभ देवून त्याची रक्कमही लाटण्यात आली. यासंदर्भात तक्रार करण्यात आल्याने या घरकुल घोटाळ्याची चौकशी सुरु करण्यात आली असून शासनाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

rajura jpg webp webp

राजुरा ता. मुक्ताईनगर येथील ग्रा.पं. उपसरपंच व आताचे प्रभारी सरपंच राहुल अप्पा रोटे यात यांनी शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत 126/ या ग्रा.पं. च्या 8 अ उतार्‍यावर घरकुल निधीचा लाभ घेतला आहे. 126 /1,2,3, हि जागा अद्यापही बखळ असुन राहुल रोठे यांच्या वडिलांच्या नावाने जागा असून 126 च्या याच जागेवर त्यांनी भाऊ व त्यांच्या पत्नीच्या नावेही घरकुल योजनेच्या लाभ घेतला आहे.

---Advertisement---

इतकेच नव्हेतर शासनाच्या गायगोठा योजनेचेही मष्टर काढले असून यात ग्रामसेवक व रोजगार सेवक अश्या शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाभ घेतला असल्याने त्यांचे विरुद्ध चौकशीअंती फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी पंकज रामधन रोटे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आदेशान्वये गटविकास अधिकारी पंचायत समिती मुक्ताईनगर यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे सांगीतले. तर गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे सांगीतले असता त्यांनी सदरहु जागेवर घरकुलाचे बांधकाम अर्धवट असुन गाय गोठा दिसत नसल्याचे अहवालात नमुद केले आहे. मात्र,या प्रकरणाला दोन महिन्याचा कालावधी होवून सुद्धा दोषींवर कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर घरकुल व गायगोठा निधीच्या अपहार प्रकरणी प्रशासन दोषींची पाठराखण करीत असल्याचे पंकज रोटे यांनी सांगितले.

यांच्यावर निधी अपहाराचा ठपका?
राहुल अप्पा रोटे हे सन – ११ / २ / २०२१ पासून ग्राम पंचायत सदस्य उपसरपंच व आता प्रभारी सरपंच पदावर कार्यरत असुन त्यांनी दोन वर्षाच्या कालावधीत सौ . कल्पना राहुल रोटे, रामधन अप्पा रोटे, सौ . वैशाली रामधन रोटे, गौतम अप्पा रोटे व सौ . दिपाली गौतम रोटे यांचे नावे घरकुल व गाय गोठ्याच्या निधीचा लाभ घेवून शासनाच्या निधीचा अपहार केला आहे.यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पंकज रामधन रोटे यांनी केली आहे

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---