जळगाव शहर

आंदोलनापूर्वीच नगरसेवकांनी बुजविले खड्डे, नागरिकांचा विरोध

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ ।  शहरातील मेहरुण परिसरातील शेरा चौकात रस्त्यावर असलेले खड्डे बुजविण्यासाठी आंदोलन करण्यात येणार होते.नगरसेवक आणि संबधित मक्तेदाराला याबाबत माहिती मिळताच त्यांनी तत्काळ खड्डे बुजविण्यासाठी सुरुवात केली. एक खड्डा बुजविण्यात आल्यानंतर नागरिकांनी विरोध दर्शवित आपले आंदोलन पार पडले. घडलेल्या प्रकारात आंदोलकांनी आपली भूमिका पार पडली असली तरी नेमका विरोध म्हणून विरोध केला की समस्या मार्गी लागण्यासाठी विरोध केला? हे कळले नाही.

शेरा चौक या गजबजलेल्या चौकात अमृत योजने अंतर्गत वीस दिवसापासून दोन खड्डे करून ठेवलेले होते. ते खड्डे  बुजविण्यासाठी वारंवार तक्रार व निवेदन करूनही अमृत योजनेचे अधिकारी व नगरसेवक तो खड्डा बुजवत नव्हते. म्हणून राष्ट्रवादीचे साहिल पटेल यांनी आंदोलन करण्याचे ठरवले. 

त्यानिमित्ताने सोमवारी अकरा वाजता शेरा चौकात त्या खड्ड्यांमध्ये पाणी भरून मासे टाकण्याचे आंदोलन करण्यात येणार होते. ही माहिती नगरसेवकांना व अमृत योजनेच्या अधिकाऱ्याला माहित पडले. आंदोलन सुरू होण्याच्या अगोदर जेसीपी लावून ते पाईप न जोडता एमआयएमचे नगरसेवक रियाज बागवान तिथे आले. त्यांनी खड्डे माती टाकून बंद करणे सुरू केले. त्यांना विरोध करूनही त्यांनी एक खड्डा बंद केला दुसरा खड्डा काम न करता बंद करत असतांना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्या खड्ड्यात उतरले. व त्यांनी पहिले तो पाईप जोडा व नंतर खड्डे बंद करा असा आग्रह धरला व ते त्या खड्ड्यात उतरले व तो खड्डा बुजवू दिला नाही. 

खड्ड्याला गुलाबाचे पुष्प देत राष्ट्रवादीचे साहिल पटेल, डॉक्टर रिजवान खाटीक व सामाजिक कार्यकर्ते रिजवान जहागीरदार, नबील शेख, रफिक शेख, हाशिम पटेल, महमूद शेख, जाहिद शाह यांनी श्रद्धांजली वाहिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button