वाणिज्य

तुमचा स्मार्टफोन असा चार्ज करत असाल तर सावधान…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । स्मार्टफोन जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचा भाग झाला आहे. अनेकांना फोन रात्री चार्जला लावायची सवय असते. रात्री फोन चार्जिंगला लावून सकाळपर्यंत तो तसाच चार्ज होत राहतो. परंतु, ही सवय जीवावरही बेतू शकते. नुकतीच अशी एक घटना समोर आली असून एका महिलेचा यात मृत्यू झाला असून दोन मुलं गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये ही दुर्घटना घडली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. रात्री महिला आपल्या दोन मुलांसह खाटेवर झोपून मोबाइल पाहत होती. मोबाइल पाहताना महिलेने मोबाइल चार्जिंग प्लगमध्ये लावला होता. त्यानंतर मोबाइल तसाच चार्जिंगला ठेवून ती झोपली. पण मध्यरात्री मोबाइल किंवा चार्जरमध्ये करंट आल्याने मोठा ब्लॉस्ट झाला.

रात्रभर मोबाइल चार्जिंगला ठेवू नका-

मोबाइल कधीही रात्रभर चार्जिंगसाठी ठेवू नका. यामुळे मोबाइलची बॅटरी खराब होऊ शकते. मोबाइलच्या अधिकच्या वापरामुळे अनेकांना सतत मोबाइल चार्ज करावा लागतो. त्यामुळे अनेक जणांना मोबाइल रात्रभर चार्जला ठेवून सकाळी संपूर्ण चार्ज झालेला फोन वापरायची सवय असते. परंतु रात्रभर चार्ज केल्याने ओव्हर चार्जमुळेही मोबाइल ब्लास्ट होतो.

दरम्यान, रात्रभर चार्जिंगमुळे मोबाइल ब्लास्ट होण्याचा धोका निर्माण होतो. ओव्हर चार्जिंग फोनसाठी धोकादायक ठरतं. यामुळे बॅटरी लाइफ कमी होतं. तसंच फोनवरही याचा परिणाम होतो.

Related Articles

Back to top button