जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२२ । गेल्या कित्येक दिवसापासून महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचा चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे नेते हे राज ठाकरे यांची भेट सुद्धा घेत आहेत. यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हे दोन्ही पक्ष एकत्र येतील असे म्हटले जात आहे.
याबाबत विविध राजकीय विश्लेषक आपापली मतं देखील मांडत आहेत. मत मांडताना हे राजकीय विश्लेषक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि ठाकरेंना जवळ घेण्यासाठी मनसे आणि भारतीय जनता पक्षाची युती होऊ शकतात असे म्हटत आहेत. मात्र यावर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठ विधान केल आहे.
उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाशी फारकत घेऊन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जात महाविकास आघाडी बनवली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेतून तब्बल 40 आमदार आपल्या सोबत घेत भारतीय जनता पक्षाची युती केली व स्वतः मुख्यमंत्री झाले. अशावेळी भारतीय जनता पक्षाला स्वतः सोबत ठाकरे हे नाव हव आहे. म्हणून भारतीय जनता पक्ष राज ठाकरे यांच्याशी युती करू शकतो असे म्हटले जात आहे.
मात्र या सगळ्या प्रकरणावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी युती ही केवळ शिवसेना भारतीय जनता पक्षाचीच होईल असे विधान केले आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की नाशिकमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) युती करून लढतील. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेने बाबत कोणतेही भाष्य केले नाही.