बापरे! नाश्ता करण्यासाठी गेला अन् अंगावर गरम तेल पडले!

ऑक्टोबर 7, 2022 2:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२२ । यावल शहरातील भुसावळ टि-पॉइंट जवळील एका अल्पोहारच्या दुकानात नाश्ता करण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणाच्या अंगावर गरम तेल पडल्याने तरुण जखमी झाला. ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यास जळगावी हलवण्यात आले.

jalgaon 2022 10 07T143703.176 jpg webp

चंद्रकांत बळीराम बाविस्कर (20, रा.वढोदे, ता.यावल) हा तरुण यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या एका अल्पोहाराच्या दुकानात नाश्ता करण्यासाठी गेला असता तेथे गरम तेल अंगावर पडल्याने त्याच्या उजव्या बाजुने डोके व पाठ भाजली गेली.यावल ग्रामीण रुग्णालयात त्यास उपचाराकरीता दाखल केले असता डॉ.पवन जैन, अधिपरीचारीका मनिषा धांडे, संजय जेधे यांनी प्रथमोपचार केले व त्यास पुढील उपचारा करीता जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now