गुन्हेजळगाव जिल्हा

बापरे : गुटखा माफियाच्या शोधात बुलढाणा पोलीस आली जळगावात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२२ । बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे नुकताच मोठ्या प्रमाणावर गुटखा जप्त करण्यात आला होता. हा गुटखा तब्बल २६ लाखांचा होता. त्यावेळी जळगावच्या दोघांना अटक करण्यात आली होती. चौकशीतून गुटखा तस्करीचा मुख्य सूत्रधार जळगावचा असल्याची माहिती समोर आली असल्याने बुलढाणा पोलिसांचे एक पथक जळगावात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मागील महिन्यांत चाळीसगाव तालुक्यात पोलिसांनी अनेकदा कारवाई करून गुटखातस्करांना पकडले. आता जिल्ह्यातील तस्करांना बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील कारवाईत जळगाव जिल्ह्यातील दोघांचा समावेश असल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. मध्य प्रदेशातून बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथे एका ट्रकमधून गुटखा येत असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या पथकातील पोलिस उपनिरिक्षक पंकज सपकाळे यांना मिळाली होती. त्यानुसार पोहेका गजानन बोरसे, नापोका गजानन आहेर, नापोका संदीप टकसाळ व राम धामोडे यांनी(एमएच ०४, ईबी ९८७२) क्रमांकाच्या ट्रकसह तिघांना ताब्यात घेतले होते.

यात २५ लाखांचा गुटखा आणि ट्रकसह एकूण ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी अजय गजानन गोसावी आणि सागर यशवंत औतार हे जळगावातील रहिवासी असून गजानन मापारी हा लोणार येथील रहिवासी आहे. दरम्यान, जळगावचे दोघं फक्त चालक आणि क्लिनर असल्याची प्राथमिक माहितीत समोर आले होते. एवढेच नव्हे तर मुख्य गुटखा किंग हा जळगावातील असून त्याच्यावर याआधी देखील अनेक गुन्हे दाखल असल्याचे कळते. याच मुख्य गुटखा माफियाच्या शोधात बुलढाणा पोलिसांचे एक पथक जळगावात आले होते,

Related Articles

Back to top button