---Advertisement---
जळगाव जिल्हा विशेष

‘हाई झुमका वाली पोर’ अहिराणी गाणं देशातील ‘टॉप 10’ गाण्यांमध्ये

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | ९ जानेवारी २०२३ | ‘हाई झुमका वाली पोर’ हे अहिराणी गाणं सर्वत्र प्रचंड धुमाकुळ घालत आहे. लग्न, हळदीचा कार्यक्रमासह अन्य कोणतेही सेलिब्रेशन असो, हे गाणं नाही वाजलं तर तो कार्यक्रम पूर्ण होतच नाही. ‘हाई झुमका वाली पोर’ या गाण्याने केवळ अहिराणी भाषा बोलल्या जाणार्‍या खान्देशला वेड लावलं नसून भाषा व राज्यांच्या सीमा तोडून संपूर्ण देशाने या गाण्याला डोक्यावर घेतलं आहे. युट्यूबवर या गाण्याला अवघ्या महिनाभरात तब्बल ४.९ कोटी व्ह्युज मिळाले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, युट्यूबवर ‘टॉप १०० म्युझिक व्हिडिओ’ मध्ये हे गाणं संपूर्ण देशात ६ नंबर वर आहे.

jhumkawali Por jpg webp webp

‘हाई झुमका वाली पोर’ हे गाणं विनोद कुमावत आणि गायक भैय्या मोरे तयार केले असून भैय्या मोरे व अंजना बर्लेकर हे गायक आहेत. या गाण्यात कलावंत म्हणून विनोद कुमावत व राणी कुमावत यांनी कामं केलं आहे. या गाण्याला यूट्यूबवर प्रदर्शित झाल्यापासून अवघ्या एक महिन्यात तब्बल ४ कोटी ९० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. युट्यूबवर देशातील ‘टॉप १०० म्युझिक व्हिडिओ’ मध्ये या गाण्याने झेप घेतली आहे. विशेष म्हणजे बॉलीवूड व साऊथच्या मोठ्या चित्रपटांच्या गाण्यांना धोबीपछाड देत ‘हाई झुमका वाली पोर’ या गाण्याने बाजी मारली आहे. ‘टॉप १०० म्युझिक व्हिडिओ’ मध्ये पहिल्या क्रमांकावर शाहरुख खानच्या पठाण चित्रपटातील बेशरम रंग हे गाण ट्रेंडींग करत आहे. दुसर्‍या क्रमाकांवर मान मेरी जान (किंग), तिसर्‍या क्रमांकावर झुमे जो पठाण (पठाण), चौथ्या क्रमाकांवर हरी हरी ओढणी (भोजपूरी गाने), पाचव्या क्रमाकांवर रंजिथामे (तमिळ गाने) तर सहाव्या क्रमाकांवर केसरिया तेरा (ब्रम्हास्त्र) हे गाण ट्रेंड करत आहे.

---Advertisement---

असे आहेत गाण्याचे बोल :

हाई झुमका वाली पोर हाई नदी थडी ले चालनी
नदी थडी ले चालनी हाई नदी थडी ले चालनी
मना राघ्या वाघ्या नी जोडी पाणी प्यावाले ती थडी चालनी
हाई झुमका वाली पोर हाई नदी थडी ले चालनी
तीना नजरना तो असा घावस मला वाटाय तो मना डाव स
आशी दखी दखी करू नको घायल थोडी नजर दे तुना प्यारणी
हाई झुमका वाली पोर

उनपडे तुना साडीवर पोर ऐशी का मना गाडी वर
अशी टकमक काय मानमान मखडाई राहिणी
हाई झुमका वाली पोर..

मस्तानी मन नाव स तूच मना बाजीराव स
तुना सांगे मी येसु साजन माले करिले तू मनी साजणी
हाई झुमका वाली पोर

। हाई झुमका वाली पोर । Hai jhumka vali por ।Super hit ahirani khandeshi song #Vinod_kumavat

बबल्या इकस केसावर फुगे’ या गाण्याला यूट्यूबवर तब्बल २६ कोटी ६० लाख व्ह्यूज

सचिन कुमावत हे अहिराणी गाण्यांच्या इंडस्ट्रीमधील सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत अनेक गाणी तयार केली आहेत आणि कोट्यवधी प्रेक्षकांनी ती यूट्यूबवर पाहिली देखील आहेत. त्यांच्या ‘बबल्या इकस केसावर फुगे’ या गाण्याने यूट्यूबवर तब्बल २६ कोटी ६० लाख व्ह्यूज मिळवले होते. ‘सावन ना महिना मा’ या गाण्यालाही तब्बल ९ कोटी ७० लाख व्ह्यूज आहेत. अण्णा सुरवाडे यांनी हे गाणं गायलं आहे. विनोद कुमावत यांचे ‘माडी वहू तुले येईजाई कर मनं लगन’ हे वर्षभरापूर्वी प्रदर्शित झालेलं गाणं आजही तितकचं लोकप्रिय आहे. या गाण्याने गेल्या वर्षभरात ५ कोटी १० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवले आहेत.

हे पण वाचा : आहिराणी गाण्यांवर थिरकतोय संपूर्ण महाराष्ट्र ; वाचा अहिराणी म्युझिक इंडस्ट्रीची कहाणी

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---