⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

गुलाबी शहराला भूकंपाचे धक्के, नागरिकांनी अनुभवले भूकंपाचे झटके

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२२ । राजस्थानच्या जयपूरमध्ये शुक्रवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर लोक घराबाहेर पडले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, जयपूरमध्ये सकाळी ८ वाजून १ मिनिटांनी कमी तीव्रतेचा भूकंप झाला.

रिऍक्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.8 इतकी होती. शास्त्रज्ञांनी सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पाच किलोमीटर खोलीवर होता. मात्र या भूकंपात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे समजते. राजस्थानच्या मध्यभागापासून उत्तर पश्चिमकडे ९२ किलोमीटर अंतरावर हा भूकंप झाला आहे.