जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२२ । मुक्ताईनगरा शहरातील एका 55 वर्षीय वकिलाने केस न घेतल्याने त्यास जातीवाचक शिविगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली घटना घडली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयीत आरोपी संजय जोशी, चारूशीला जोशी व लड्डू संजय जोशी (शहापूरा, जि.बर्हाणपूर) यांनी गुरुवारी दुपारी एक वाजता 55 वर्षीय वकिलास केस न घेतल्याच्या रागातून न्यायालय रस्त्यावर जातीवाचक शिविगाळ केली. तसेच त्यांची कॉलरही पकडण्यात आली तसेच वाहनावर चपला मारून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे करीत आहेत.













