बाप रे.. घराची भिंत फोडून घरफोडी, एक लाखाचे चांदीचे दागिने लंपास!

सप्टेंबर 10, 2022 2:12 PM

Chalisgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण वाढले असून नागिरकांमध्ये भीती पसरली आहे. आता तर रोजच चोरी होत असल्याचे समोर येत असून चाळीसगाव तालुक्यातील आबेहोळ येथील एका घरात चोरट्यांनी १ लाख रुपयांचे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम घेवून पोबारा केला आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 09 03T132219.635 1 jpg webp

विठ्ठल हंसराज चव्हाण (वय ३५) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. तालुक्यातील आबेहोळ येथील चव्हाण वास्तव्यास असून ९ रोजी रात्रीच्या सुमारास यांच्या घराच्या मागील भिंत फोडून चोरट्यांनी आत प्रवेश कानातील सोन्याच्या २ रिंग २५ हजार रुपये किमतीच्या, हातातील चांदीचेकडे १५ हजार रुपये किमतीचे, ५०० रुपयाच्या १२० नोटा ६०००० रुपये असा एकूण १ लाख रुपये चोरट्यांनी चोरून नेले आहे. याप्रकरणी विठ्ठल हंसराज चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी लोकेश पवार करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now