बाप रे.. फैजपूर मर्चट सोसायटीत ४ कोटी २० लाखांचा अपहार!

सप्टेंबर 11, 2022 4:28 PM

Faijpur News-जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२२ । फैजपूर शहरातील फैजपूर मर्चट सोसायटीत एका व्यक्तीने तब्बल ४ कोटी २० लाख रुपयाचा अपहार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविद्र भागवत जावळे (वय ६०, धंदा शेती व व्यापार रा. फैजपूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, जावळे यांच्या नातेवाईकाकडून उमेश मुकुंद वाणी (वय ५०, धंदा : व्यापार, रा.ढाके वाडी जळगाव), अशोक गोपनाथ मंडोरे (वय ६० रा.श्रद्धा बंगला, गणपती नगर जळगाव), प्रदीप अरुण वाणई (वय ४०, रा. खान्देस मिल कॉलनी,जळगाव), संजय मोतीराम जैन (वय ४५, रा. जळगाव, जि.के.भारंबे (वय ६१, सेवानिवृत्त रा.रोझोदा ता.यावल) यांनी सुमारे ४ कोटी २० लाख रुपये घेवून फैजपूर मर्चट बँकेत जमा करणार असल्याचे सांगितले होते.

crime 2022 06 10T101407.018

परंतु, ते पैसे जावळे व त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर जमा न करता पदाचा दुरुपयोग करून ४ कोटी २० लाखांचा अपहार केला. एवढेच नव्हे तर, दप्तर जमा न करून शासनाची देखील फसवणूक करीत बोगस दस्त देखील बनविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेका.अनिल पाटील हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now