जळगाव जिल्हा

बँक ऑफ महाराष्ट्र कर्ज वितरण, बचत वाढीमध्ये अव्वल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२१ । बँक ऑफ महाराष्ट्रने प्रसिद्ध केलेल्या माहितीप्रमाणे एप्रिल ते जून (आर्थिक वर्ष २०२१-२२) या तिमाहीमध्ये कर्ज वितरणामध्ये १४.४६ टक्के वाढीस एकूण कर्ज वितरण १,१०,५९२ कोटी इतकी नोंद झाली आहे. जून अखेरच्या याच तिमाहीमध्ये १०.१३ टक्के वाढीसह पंजाब अँड सिंध बँकेने एकूण ६७,९३३ कोटी इतकी कर्जे वितरण करून द्वितीय स्थान पटकावले आहे. डिपॉझिट मोबीलायझेशनच्या संदर्भात पंजाब अँड सिंध बँकेनंतर १४ टक्के वाढीसह बँक ऑफ महाराष्ट्रचा प्रथम क्रमांक आहे.

अर्थातच, भारतातील सर्वात मोठी असलेली स्टेट बैंक ऑफ इंडियाने ८.८२ टक्के इतक्या वृद्धीची नोंद केली आहे . बँक ऑफ महाराष्ट्रपेक्षा (१.७४ लाख कोटी ) ३७.२० लाख कोटी डिपॉझिटसह स्टेट बँक ऑफ इंडियाचा बेस २१ पट जास्त आहेच . चालू व बचत खात्यामध्ये २२ टक्के वाढीसह सर्व सरकारी बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र या तिमाहीत अव्वल स्थानी आहे . बँकेच्या देय यादीत चालू व बचत खाते रक्कम ९ २,४ ९ १ कोटींसह एकूण ५३ टक्के इतका हिस्सा आहे.

२०२१ जूनअखेर बैंक ऑफ महाराष्ट्रचा एकूण व्यवसाय १४.१७ टक्क्यांनी वाढून २.८५ लाख कोटी इतका झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीमध्ये झालेल्या १०१ कोटी नफ्याच्या तुलनेत यावर्षी महाबँकेला २०८ कोटी इतका नफा झाला आहे. एकूण बुडीत कर्जे किंवाएन. पी. ए. जूनअखेर तिमाहीत मागील वर्षीच्या १०.९ ३ टक्केच्या तुलनेत ६.३५ टक्के इतका खाली आल्याने बँकेच्या संपत्तीचा दर्जा सुधारला आहे . जूनअखेरच्या तिमाहीत मागील वर्षी १०,५५८.५३ कोटी इतकी रक्कम बुडीत कर्जे सदराखाली होती व या वर्षीही रक्कम मात्र कमी होऊन ७,०२२ कोटी इतकी झाली आहे. निव्वळ एन. पी. ए. ४.१० टक्के ( ३,६७७.३९ कोटी ) वरून २.२२ टक्के (२,३५२.७५ कोटी) वर आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button