धनंजय चौधरी यांच्या जाहीर सभेत बाळासाहेब थोरातांची भाजपवर टीका
जळगाव लाईव्ह न्यूज । रावेर यावल विधानसभा मतदार संघाच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांच्या प्रचारार्थ (दि.७) रावेर येथे आठवडे बाजार मैदानावर काँग्रेसचे नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
या जाहीर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीका केली. भाजपवर टीकास्त्र करत बाळासाहेब यांनी रावेर येथील सभा गाजवली तसेच धनंजय चौधरी यांच्यासाठी मतदानाची साद देखील घातली. या जाहीर सभेला तेलंगणाच्या ग्रामविकास मंत्री सीताक्का, शिवसेना संपर्क नेते संजय सावंत, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, उदय पाटील, ज्येष्ठ नेते रवींद्र भैय्या पाटील, माजी आमदार रमेश दादा चौधरी, श्रीराम पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी यांचेसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी धनंजय चौधरी यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले एका परिपक्व व्यक्तीसारखं भाषण आज या तरुण युवकाने केले. तुमच्यासमोर तुमचा गडी तयार आहे, तुम्हाला गोड फळ खायचं असेल कायम चांगल्या गोष्टी हव्या असतील तर त्यासाठी त्याला मशागत करावीच लागते. नक्कीच मतदार मतदार संघातील नागरिक धनंजयला बळ देतील. तरुण जरी नवखा उमेदवार असला तरी त्याला तुमची साथ द्या. तो पुढचे अनेक वर्ष कायम तुमच्यासोबत असेल असे देखील यावेळी ते म्हणाले.
अजित दादांवरही टीका
महाराष्ट्र मोडीत काढल्याने त्यांनी ७० हजार कोटींचा घोटाळा केला यांचेच पंतप्रधान बोलले, लगेच इकडे येऊन परत तिजोरीच्या चाव्यात त्यांनाच दिल्या, असे म्हणत अजित पवारांवरही त्यांनी निशाणा साधला.