---Advertisement---
धरणगाव

बालाजी वहनोत्सव : गुलाबराव देवकर बनले वहनोत्सवाचे गाडीवान

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२२ । धरणगाव येथील प्राचीन परंपरा असलेल्या बालाजी वहनोत्सवात रविवारी राजहंसाचे वहन निघाले. त्यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी काही वेळ वहनाची गाडी चालवून गाडी वाहनाची भूमिका निभावली.

jalgaon 2022 10 03T200112.164

धरणगावात निघालेल्या वहनोत्सवात आजच्या वाहनाचे जोडीचे मालक सत्यवान जगन्नाथ कंखरे व श्दिनेश जगन्नाथ कंखरे यांच्या तर्फे वाहन उत्सवात सहभाग घेणाऱ्या प्रत्येक लेझीम पथकास १ हजार १११/- रूपये बक्षिस श्री देवकर व शिवसेना सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी सुरेश सीताराम चौधरी. जीवन आप्पा बयस, माझी उपनगराध्यक्ष गोविंदा प्रकाश कंखरे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन यादवराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणगाव तालुका कार्याध्यक्ष अरविंद देवरे, या प्रमुख मंडळींसह गोविंदा मनोरे, बापू धनगर, ईश्वर सोनार, संभाजी कंखरे, निलेश चौधरी, अनिल हरपे, अजय महाजन, राजू धनगर, पिंटू कंखरे, शुभम कंखरे, पवन कंखरे, सोनल धनगर, लालू धनगर आदी उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---