गुन्हेजळगाव जिल्हा

बकाले यांचे निलंबन, वाचा संपूर्ण आदेश जसाच्या तसा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी याबाबतचे आदेश रात्री उशिरा काढले आहेत.

मराठा समाजाविषयी बकालेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी बकालेंविरुध्द कठोर कारवाई करण्यासंदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षकांना प्रस्ताव पाठविला होता. याच बरोबर बकालेंना तडकाफडकी पदावरून बाजूला सारत नियंत्रण कक्षात जमा केले होते. मात्र विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी किरणकुमार बकाले यांना निलंबित कारण्याचे आदेश काढले आहेत.

बकालेंविरुद्ध अत्यंत गंभीर स्वरुपाच्या प्राथमिक चौकशी सुरु करण्यात आली असून, सदरचे प्राथमिक चौकशीत बाधा आणू नये, फेरफार करु नये, ती पारदर्शकरित्या व्हावी. साक्षीदारांवर दबाव आणू नये किंवा प्रलोभन दाखवू नये सुरू करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीचे अनुषंगाने बकाले यांना “शासकीय सेवेतून निलंबित” करण्याचे आदेशात म्हटले आहे.

निलंबन काळात बकाले यांचे पोलीस मुख्यालय हे नाशिक ग्रामीण राहणार आहे. तसेच त्यांना पोलीस उप अधीक्षक (मुख्या), नाशिक ग्रामीण यांच्याकडे दररोज नियमित हजेरी देण्यासह कोणत्याही परिस्थीतीत पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांच्या लेखी परवानगीशिवाय मुख्यालय सोडून जावू नये. सदर आदेशाचे पालन केले नाही तर विनापरवाना मुख्यालय सोडले असे मानण्यात येवून वेगळी शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, अशा सक्त सूचना बकाले यांना देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Back to top button